इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह

0

बगदाद- इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. काल रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला. ५८ वर्षीय बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.

दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला. २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत. इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे १५ दिवसांची कालावधी असेल.