इनरव्हिलने दिले शालेय साहित्य भेट

0

करुंजगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून क्लबच्या अध्यक्षा हेमलता खळदे व सहकार्‍यांच्या हस्ते विविध प्रकारचे शालेय साहित्य देण्यात आले. करुंजगाव हे विविध सोयी सुविधा करून देण्यासाठी क्लबने दत्तक घेतले आहे. त्यामधील एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या अध्यक्षा सारिका भेगडे, सरपंच संगीता राऊत, मुख्यध्यापक भजनावळे सर, अल्पना हुंडारे सह क्लबचे सभासद, शिक्षक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेस क्लबने संगणक, कपाट, लायब्ररी कपाट, खेळाचे साहित्य, खुर्च्या, टेबल फॅन, घड्याळे, लेझीम, डंबेल्स, फिनेल, पाईप झाडू, कुंडी रोपे, सतरंजी, बस्कर, पाट्या, धान्याचे डब्बे, नववीतील विद्यार्थ्यांना पुस्तके आदि साहित्य देण्यात आले. या बद्दल समस्त गावकर्‍यांनी आभार मानले.

Copy