इतिहासाच्या पाऊलखुणा या व्याख्यानाचे आयोजन

0

चाळीसगाव । भारताचा खरा इतिहास जनतेसमोर यावा, युवा इतिहास संशोधकांच्या माध्यमातून हा इतिहास जनतेपर्यंन्त पोहचविण्यासाठी व इतिहासाची खरोखर आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना याची माहीती व्हावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने इतिहासाच्या पाऊलखुणा या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार 19 मार्च 2017 रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘छत्रपती शिवराय काल आज व उद्या, महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातून मराठा स्कुल ऑफ थॉट’ची निर्मिती, अपरिचित शिवराय, शिवकालीन कृषी व्यवस्था व किल्ल्यांचे स्थापत्य विशेष या विषयावर कार्यक्रम होणार आहे. येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने 13 फेब्रुवारी 2017 रोजी चाळीसगाव येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यांची होती उपस्थिती

या बैठकीत सदर कार्यक्रम 19 मार्च 2017 रोजी चाळीसगाव येथे होणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘अपरिचित शिवराय’ या विषयावर अ‍ॅड.रवींद्र यादव ‘शिवकालीन कृषी व्यवस्था’ या विषयावर महेश बुलाख तर ‘किल्ल्यांचे स्थापत्य विशेष’ या विषयावर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 फेब्रुवारी 2017 रोजी चाळीसगाव येथे बैठक घेण्यात आली. असून या बैठकीत विचार विनीमय करून इतिहासाच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम चाळीसगाव येथे 19 मार्च 2017 रोजी घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. बैठकीस सह्याद्री प्रतिष्ठानचे विवेक सुर्यवंशी, शरद पाटील, रविंद्र सुर्यवंशी, पप्पु राजपूत, प्रकाश नायर, दिनेश हमलाई, अजय जोशी, मुराद पटेल, सुर्यकांत कदम, आरीफ खाटीक, विजय गायकवाड, किरण घोरपडे, योगेश शेलके, संजय गायकवाड उपस्थित होते.