इंधन दरवाढीविरोधात यावलमध्ये काँग्रेसची सायकल रॅली

आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

यावल : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गत सात वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या अन्यायकारक महागाईविरोधात यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीद्वारा रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. यावल शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकी संघापासून रॅलीला सुरूवात झाली. बुरुज चौक, बोरावल गेटमार्गे सिनेमा चौक, चोपडा रस्त्यावरील पेट्रोल पंपापर्यंत रॅली काढण्यात आली.

जुलमी केंद्र सरकारचा निषेध
रॅलीत अनेक कार्यकर्ते सायकल घेऊन सहभागी झाले. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या अन्यायकारक भाव वाढीमुळे सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, दलित आदिवासी सह इतर समाज भरडला जात असून या जुलमी केंद्र सरकारचा जोरदार निषेध रॅलीतून करण्यात आला आणि सह्यांची मोहिम पेट्रोल पंपावर राबवण्यात आली.

केंद्र सरकारवर चढवला हल्ला
यावेळी आमदार शिरीष चौधरी, जि.प.परीषद गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर यावल शहरातील प्रत्येक चौकात सायकल रॅली थांबवून लाऊड स्पीकरद्वारे भाषण देऊन जोरदार हल्ला चढवला तसेच उपस्थित काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. मोदी सरकार हाय हाय, एकही भूल कमल का फुल, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, नही चलेगी नही चलेगी मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, बस करो महंगायी की मार वापस जावो मोदी सरकार अशा घोषणा देऊन संपूर्ण यावल शहर दणाणून सोडले.

यांचा सायकल रॅलीत सहभाग
यावेळी शहरातून सायकल रॅली जात असतांना जनतेनेही हात देऊन रॅलीचे समर्थन केले. रॅलीत माजी आमदार रमेश चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, युवा नेते व वढोदेचे तरुण सरपंच संदीपभैय्या सोनवणे यांच्यासह त्यांचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल मेंबर, नगरसेवक समीर मोमीन, जाकीरभाई, अस्लम शेख, समीर खान, फैजपूरचे सर्व नगरसेवक, फैजपूर शहराध्यक्ष रीयाजभाई, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे सह त्यांचे सर्व कार्यकर्ते हाजी गफ्फार शाह, काँग्रेस सेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष अभय महाजन, शहराध्यक्ष नईमभाई शेख, विक्की पाटील, विनोद पाटील, तौफिक शेख, दहिगावचे तरुण तडफदार सरपंच अजय अडकमोल, बामणोद गावचे युवा सरपंच राहुल तायडे, त्यांचे सर्व कार्यकर्ते, कोरपावली गावचे तरुण सरपंच विलास अडकमोल, गौरव महाजन, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, लीलाधर सोनवणे, समाधान पाटील, रमेश पाटील, धीरज महाजन, अशपाक शाह, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, विक्की सोनवणे, धीरज सोनवणे, राजू पिंजारी, इम्रान पहेलवान, सत्तारभाई तडवी, बशीर तडवी, पुंडलिक बारी, अभिषेक इंगळे व अन्य कार्यकर्ते भर पावसातही रॅलीत सहभागी झाले.