इंदाणी विद्यालयात विविध उपक्रम राबवून अभिवादन

0

नंदुरबार – तालुक्यातील कोपर्ली येथील इंदाणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती
निमित्त कोपर्ली गावात ग्रामस्वच्छता अभियान, शाळेत चित्रकला प्रदर्शन तसेच हात धुवा कार्यक्रम राबवून महात्म्यांना अभिवादन
करण्यात आले. कोपर्ली येथील राज खांब येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री
यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच प्रकाश चौधरी यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सदस्य रशिद खाटीक, खंडू भिल, महाविद्यालयाचे
प्राचार्य एस.एन.पाटील, पर्यवेक्षक एस.एन.देसले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली. यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यालयात चित्रकला
स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेय परिसरात महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा व हात धुवा मोहीम राबविण्यात
आली. यावेळी प्राचार्य पाटील यांनी मनोगतात ग्राम स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा, हात धूवा अभियान याविषयी मार्गदर्शन करुन
महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जिवन कार्याचीही सविस्तर माहिती दिली.

Copy