‘इंडीयन एक्सलंट अवार्ड’ने डॉ.भगवान कुयटेंना केले सन्मानीत

0

नवी दिल्ली येथे मोठ्या दिमाखात सोहळा उत्साहात
रावेर- नवी दिल्ली येथे नुकतेच समर्थ हॉस्पिटलचे डॉ भगवान कुयटेंना वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल इंडीयन एक्सलंट अवार्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भारतीय काँग्रेसचे मुख्य सचिव देवेंद्र प्रकाश, भारतीय शैक्षणिक बोर्डचे मुख्य संचालक डॉ.विपिन वर्मा, भारताचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचे पुत्र रवी सितारामन, भारतीय मानव अधिकारचे संस्थेचे मुख्यधिकारी प्रभा शंकरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

पुरस्काराने कामाला गती येईल
यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे नामवंत पुरस्कारार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व समाजतून डॉ.कुयटे यांचे अभीनंदन होत आहे. गरजु गरीब जनतेची सेवा करणे सर्व समाजबांधवांच्या प्रबोधनाच्या कार्यासाठी सतत पुढाकार असतो माझ्या कार्याची दखल घेत मला पुरस्काराने गौरवील्याने यापुढेही अजुन गरजुंसाठी जनसेवा करण्याची मला ताकद मिळेल, या पुरस्काराच्या माध्यमातून मिळनार असल्याचे त्यांनी पुरस्काराला उत्तर देतांना सांगितले.

वैद्यकीयसेवे सोबत समाजसेवेची आवड
वैद्यकीय सेवे सोबत समाज सेवेची सुध्दा मला आवड असुन प्रत्येक २१ तारखेला समर्थ हॉस्पीटल मार्फत मोफत शिबिर,अपंगासाठी दरमहा मेडिकल्स कॅम्प, आदिवासी मुलांची मोफत आरोग्य तपासणी आमच्या कडून राबविण्यात येते. आतापर्यंत देश-प्रदेश्यात वैद्यकीय क्षेत्रात मी १४ कॉन्फरन्स केले असल्याचे त्यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.