इंडिगो सीएस गाडीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

0

तळोदा: शहरातील हातोडा रस्त्यावर इंडिगो सीएस गाडी एसीमध्ये अचानक आग लागल्याने जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, 25 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या गाडीचा शिवभोजन केंद्रासाठी वापर होत होता. त्यामुळे गाडी अचानक पेट घेतल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

शहरात उपजिल्हा रुग्णालय येथे दखनी मराठा विकास मंचचे शिवभोजन केंद्र चालविले जाते. या केंद्राची ही गाडी उपजिल्हा रुग्णालयाजवळ पार्किंग केली होती. शनिवारी, 25 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या गाडीमध्ये एसीने अचानक पेट घेतला. गाडीमधून धूर निघत होता. काही क्षणात गाडी जळून खाक झाली. नगरपालिकेचा बंब पाचारण करून आग विझविण्यात आली. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याच्या घटनेमुळे शहरात चर्चेचा विषय झाला होता.

Copy