इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजला हरवत वनडे मालिकेवर केला कब्जा

0

अँटिगुवा । इंग्लंड व वेस्ट इंडिज या दोन्ही संघात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे.आत पर्यंत झालेल्या दोन्ही सामने इंग्लंडने जिकल्याने या मालिकेवर जवळपास इंग्लंडचा कब्जा झाला आहे. या दुसर्‍या सामन्यात ज्यो रुट (नाबाद 90), क्रिस वोक्स (नाबाद 68) आणि जेसन रॉय (52) यांच्या झंझावाताच्या बळावर इंग्लंडने दुसर्‍या वनडेत वेस्ट इंडीजचा 4 गड्यांनी पराभव केला. आता मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे गुरुवारी
रंगणार आहे.

वेस्ट इंडिजने केली प्रथम फलंदाजी
दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी वेस्ट इंडिजने केली .या वेस्ट इंडिजचा संघ 225 धावावर बाद झाला.या धावांचे प्रत्युत्तरात देण्यास इंग्लंड संघ उतराला असता त्यांची सुरवात निराशा जनक झाली. सलामीवीर बिलिंग्स भोपळा न फोडताच तंबूत परतला.असे असतांनाही इंग्लंडने 48.2 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

रुट-वोक्सची भागीदारी
इंग्लंडचा डाव सावरला तो ज्यो रुटने . त्याने सलामीच्या रॉयसोबत दुसर्‍या गड्यासाठी 86 धावांची भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया रचला. रुट, वोक्सच्या अर्धशतकाने सामना फिरवला. ज्यो रुट आणि वोक्सने शतकी भागीदारी रचून इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्यांनी सातव्या विकेटसाठी अभेद्य 102 धावांची भागीदारी केली. रुटने 127 चेंडूंत 3 चौकारांच्या आधारे नाबाद 90 धावा काढल्या. वोक्सने 83 चेंडूंमध्ये 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली.

दुसर्‍या जोडीची भागिदारी
वेस्ट इंडिज व इंंग्लंड यांच्यात होणार्‍या वनडे, कसोटी सामन्यात इंग्लंडने आघाडी घेतली असली तरी आज झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने सुरुवातीला इंंग्लंड संघाला चांगले जेरिस आणले मात्र वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज हे आपल्या गोलंदाजीत सातत्य न ठेवू शकल्याने इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमाने खेळ करुन आपल्या संघाला विजयापर्यंत घेवून गेले. वेस्ट इंडिज संघाने दिलेले 225 धावांचे लक्ष दुसर्‍या जोडीच्या भागिदारीने विजयाचा पाया रचला. या रचलेल्या पायावर इंग्लंडच्या 6 गडी गमवून विजय खेचून आणला.