इंग्रजी साहित्यात मानवी समाजाचे चित्रण

0

जळगाव : जगातील बहुतांश सहित्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असून यात मानवी समाजाचे चित्रण अधोरेखित झालेले आहे. संस्कृती कालानुरूप बदलत असली तरी तिचे रूप त्या त्या वेळच्या साहित्यात पाहायला मिळते असा सूर मु. जे.महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती: नवे प्रवाह’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत उमटला. मूळजी जेठा महाविदयालयातील इंग्रजी विभाग, नॉर्थ महाराष्ट्र युनिर्व्हसिटी इंग्लिश टिचरर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टिचरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रिजनल इंग्लिश लँग्वेज ऑफिस यु.एस.अ‍ॅम्बसी इंडिया (रेलो) व ब्रिटीश कौसिंल, इंडिया यांच्या सहकार्याने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेे आयोजित करण्यात आली होती. त्याचा समारोप शनिवारी 7 रोजी महाविद्यालयात करण्यात आला.ात मानवी समाजाचे चित्रण

परिषदेत 40 संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले तर चर्चासत्रात डॉ. झेड. एन पाटील व डॉ. अनिल पाठक यांनी मार्गदर्शन केले. कार्याकामाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. संस्थेचे संचालक सदस्य विद्याधर पानट होते. यावेळी संचालक मंडळातील सुनील चौधरी, डॉ. अ. न. माळी, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. भूपेंद्र केसुर, डॉ. अमोल पदवड, प्राचार्य डॉ. ए. पी. खैरनार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. पंडित चव्हाण, प्रा. योगिनी राजपुत यांनी तर आभार प्रा. दीपक चौधरी यांनी मानले.