आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपुजन

0

चोपडा : आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने आज अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य महामार्ग क्र 4 मधील 125/0ते 131/0 गलगी ते हातेड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी 1 कोटी 98 लाख रुपये खर्च येणार आहे. तालुक्यातील अकलेश्वर ते बर्‍हाणपूर राज्य महामार्ग रस्त्याची दुरावस्था झाली होती. यावेळी उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक दीपक जोहरी ,जि.प.सदस्य कल्पना कोळी, प.स.सदस्य रामचंद्र भादले,राजेंद्र पाटील, राजाराम पाटील,महेश पवार, सिताराम देवराज,प्रकाश रजाळे,सुनील चौधरी,े नितीन पाटील सीमा पाटील, विकास पाटील,रहीम बागवान,आबा देशमुख,दीपक चौधरी,हरीश पवार,सुनील बरडीया,ए.डी. कोळी,वेळोदा रमाकांत बोरसे,ईश्वर पाटील,अरुण बाविस्कर,मुरलीधर आबा,विनोद पाटील,किरण देवराज,सुरेश ढिवरे,मोहिदाचे रवीद्र पाटील,प्रदीप पाटील,श्रीराम कोळी,वढोदाचे तुषार पाटील,सुकलाल कोळी,घोडगाव संजय पाटील,रंगराव नाना,हरीश पाटील,डॉ. महेंद्र पाटील यासह पंच क्रोशीतील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.