आहरण संवितरण अधिकार्‍यांची 20 रोजी कार्यशाळा

0

जळगाव : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी मंगळवार 20 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे डिजीटल पेमेंट संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेस भारतीय स्टेट बँक व अ‍ॅक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील प्रतिनिधीसह उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.