आश्‍विनकडून कपिलदेवचा विक्रम मोडीत

0

पुणे । येथील कसोटी सामना जरी भारतीय संघ हरला असला तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने माजी कर्णधार कपिल देव यांचा मायदेशातील 37 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.अश्विनने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कला बाद करित 64 गडी बाद करित कपिल देव यांच्याही एक पाऊल पुढे टाकले. यंदाच्या मोसमात अश्विनच्या नावावर मायदेशातल्या दहा कसोटींमध्ये 64 विकेट्स जमा झाल्या आहे. त्याने कपिल देव यांचा 37 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.

सन 12-13त 10 कसोटीत 61 गडी बाद
कपिल देव यांनी 1979-80च्या मोसमात भारतातील 13 कसोटींमध्ये सर्वाधिक 63 विकेट्स काढल्या होत्या.अश्विनने तो विक्रम मोडला आहेच, पण विशेष म्हणजे त्याने कारकीर्दीत दुसर्‍यांदा मायदेशातील कसोटी सामन्यात साठहून अधिक विकेट्स काढल्या आहेत. याआधी 2012-13 या मोसमात अश्विनने भारतातील 10 कसोटी सामन्यांमध्ये 61 विकेट्स काढल्या होत्या.