आश्रमशाळेत विद्यार्थीच येईना

0

रावेर। आदिवासी भागातील आश्रम शाळा गरीब मुलांसाठी नसून गैरव्यवहार करणार्‍यांसाठी आहे की काय असा प्रश्न सर्वसाधारण जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. आदिवासी शाळांमध्ये मुलांसाठी वसतिगृह, जेवण, आणि शिक्षणाची परिस्थिती लक्षात घेता त्याचा फायदा जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, गृहपालच घेऊन कोटीच्या-कोटी उडाने घेत आहे. तालुक्यातील लालमाती येथील शाळा त्याचेच एक उदाहरण असून येथील विद्यार्थीचेही तसेच अवस्था आहे. माय-बाप सरकारचे अधिकारी येथील आणि या बोगस सिस्टमला आळा बसवेल असेच बोलके चेहरे येथील विद्यार्थ्यांचे असून त्यांची जबाबदारी असलेले मुख्याध्यापक मात्र स्वत:चे ख़ासगी कामे करण्यात स्वस्थ: असतात त्यांच्या राहण्याची, झोपण्याची, उपस्थिती, जेवणाबद्दल काहीही देण- घेण येथील शाळेला दिसत नाही. दरोरोज येथे बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी उपस्थित राहत बाकी कागदोपत्री उपस्थित राहतात. याकडे प्रकल्प विभागाने ताबडतोब लक्ष देण्याची मागणी होत असून दुर्लक्ष करणर्‍यांविरुद्ध करवाई करण्याची मागणी होत आहे.

अनेक मुले परप्रांतातील
आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणारे अनेक मुले ही शेजारील मध्य प्रदेशातील असून त्यांच्या वडिलांना पैशांचे अमिष दाखवून शाळा चालवण्यासाठी आणि आपली नोकरी वाचविण्यासाठी येथील शिक्षक वर्ग हे सर्व करीत असतात लालमाती शाळेत सुध्दा अशीच अवस्था असून मध्य प्रदेशातुन मुलांना आणून त्यांना महाराष्ट्रातील छोट्याशा खेड्यातील रहीवासी दाखवून दाखला घेऊन शाळेत प्रवेश दिला जातो आणि नंतर त्यांच्यावर येणार्‍या निधीवर मलाई खाण्याचे सर्रास काम आदिवासी भागात सुरु आहे. याबाबींकडे प्रकल्प विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पीआरसी लक्ष देणार का?
पंचायतराज समितिचा दौरा अवघ्या काही दिवसांन वर येऊन ठेवला असून त्यात अश्या आश्रम शाळेचा निकृष्ठ कारभारासमोर येत आहे मागील वर्षी पिआरसीने याच शाळेला सोयी सुविधांवरुन धारेवर धरले होते व प्रकल्प विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता मागच्या पेक्षाही बिकट अवस्था झालेली दिसत असतांना पीआरसी समिति येथे भेट देऊन मागील पाच वर्षाचे दप्तर बघून चौकशी करावी अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सोयी सुविधांचा पुरता बोझवारा उडालेला आहे.

मागील वेळी पंचायतराजने याच शाळेला भेट देऊन पाहणी केली असता येथे अनेकवेळा दुजाभाव जाणविला होता त्यावेळी येथील मुख्याध्यापक, गृहपाल, यांसह शाळेला धारेवर धरत ताशेरे ओढले होते. आज सुद्धा काहीच बदल येथे झालेला दिसत नाही. अनेक समस्या आजही जैसे-थेच आहे त्यामुळे पाणी कुठे मुरतेय आणि कारवाई का होत नाही याचे उत्तर प्रकल्प विभागाने द्यावे.
वासुदेव नरवाडे, भाजपा सरचिटणीस