आशियाई स्पर्धेत सिंधूचा धडाका; सायनाचे आव्हान संपुष्टात

0

वुहान । जगात तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या दिनार दियाह आयुस्टाईनला सहज पराभूत करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारताच्या सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत जपानच्या सयाको सातोकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सिंधूने महिला एकेरीत दिनार दियाह आयुस्टाईनला 21-8, 21-8 गेमनी 31 मिनिटांत पराभूत केले. दुसरीकडे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदकविजेती सायनाला जपानच्या सयाको सातो हिच्याकडून 19-21, 21-16, 21-18 ने पराभव स्वीकारावा लागला.

पुरुष एकेरीत अजय जयरामने चीनच्या पाचव्या मानांकित तियानला 21-18, 18-21, 21-19 असे पराभूत करीत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की एऩ रेड्डी या जोडीस पहिल्या फेरीत सिवेई झेंग आणि क्विंगचेन चेन या जोडीने केवळ 50 मिनिटांत 15-21, 21-14, 16-21 असे पराभूत केले.