आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत नेपाळचा धुव्वा

0

भोपाल । भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत नेपाळचा धुव्वा उडविला. त्यांनी 24 गोल नोंदवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली. ऐशबाग स्टेडियम येथे झालेल्या ‘ब’ गटातील सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत तीन गोल नोंदवले.

पहिला गोल केरकेटाने दुसर्‍या मिनिटाला नोंदवला. दुसरा गोल मोहम्मद सैफ खानने चौथ्या मिनिटाला आणि तिसरा गोल मनिंदर सिंहने पाचव्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर मात्र भारताने प्रतिस्पर्धी संघाला संधीच दिली नाही. एकापाठोपाठ एक असे गोल नोंदवत त्यांनी मध्यंतरापर्यंत 12-0 अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या हाफमध्ये भारताने एक डझनभर गोल नोंदवले.