आळंदीत नेत्र तपासणी शिबीर

0

मोफत नेत्र तपासणी शिबिर पडले पार
आळंदी : आळंदीमध्ये एकादशीदिनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. 70 जणांनी भाग घेऊन नेत्र तपासणी केली. यातील 18 गरजु रुग्णांची मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय, वारकरी सेवा संघ, अलंकापुरी प्रतिष्ठान, समता फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून शिबिराचे मोफत आयोजन झाले. यावेळी ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे खजिनदार दीपक पाटील, वारकरी सेवा संघ अध्यक्ष दिनेश रंधवे चोपदार, उपाध्यक्ष माधवी निगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, डॉ.वैभव कणसे, डॉ. वैभव कणसे, डॉ.दिव्या ठकरारी, डॉ.शालू चव्हाण, विठ्ठल बोचरे, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, शामराव गिलबिले, शंकर येळवंडे, अर्जुन काळे आदी उपस्थित होते.

मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले. यासाठी अधिष्ठाता ससून रुग्णालय डॉ.अजय चंदनवाले, नेत्र विभाग प्रमुख डॉ.स.वि.अंबेकर सहकार्य करणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत, रुग्णाची निवास, भोजन व प्रवास तसेच काळ्या चष्म्याचे मोफत वाटप होणार आहे. तपासणी शिबिरातील वैद्यकीय अधिकार्‍यांना ज्ञानेश्‍वरी भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Copy