आर.सी.पटेल संकुलात उद्या मम्मीजी क्रीडा महोत्सव

0

शिरपूर – शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित मम्मीजी (हेमंतबेन आर.पटेल) यांच्या वाढदिवसा निम्मिताने क्रीडा महोत्सव-2016-17 चे आयोजन करण्यात येणार आहे. या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी खेळाडू सहभागी होत आहेत मम्मीजी (हेमंतबेन आर.पटेल) यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 8.30 वाजता करण्यात येईल. बक्षिस वितरण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे उपाध्यक्ष तपनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्‍वस्त चिंतनभाई पटेल, विश्‍वस्त बबनलाल अग्रवाल, विश्‍वस्त अ‍ॅड.सी.बी.अग्रवाल, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, संस्थेचे विश्‍वस्त फिरोज काझी आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी केले आहे.

या स्पर्धा घेण्यात येणार
क्रीडा महोत्सव दोन गटात संपन्न होणार असून इ.1 ली इ.2 री मुले व मुलींच्या प्रथम गटासाठी लिंबू चमचा (50 मी.), पोत्याची शर्यत (50 मी.), तीन पायांची शर्यत (50 मी.), रिंग टाकणे (7 फूट), बादलीत चेंडू टाकणे (10 मी.). तसेच इ.3री व इ.4 थी मुले, मुलींच्या गटासाठी 100 मी. धावणे, 50 मी. लंगडी, खो-खो, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, दोरी उडी (1 मिनिट). या स्पर्धा घेण्यात येतील. महोत्सवासाठी 24 शाळांमधील 1424 विद्यार्थी सहभागी होत आहेत. विविध खेळांमधील 19 प्रशिक्षक, 24 क्रीडा शिक्षक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक परीश्रम घेत आहेत. गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थ्यांचा शालेय स्तरावर स्पर्धा व सरावाच्या माध्यमातून सराव करण्यात आला आहे.