आर.के.वाईन्स प्रकरण ; तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ, एक निलंबित

0

जळगाव – लॉकडाऊनच्या काळात आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात पोलीस कर्मचार्यांसह पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित सर्वांच्या चौकशीसह तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आले. एसआयटीकडून संबंधितांचे फोन, रेकार्डिंग, आर.के.वाईन्सच्या मालकांसह पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आले. यात थेट सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरिक्षकासह संबंधित चार कर्मचार्‍यांना याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. एसआयटीने चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिस कर्मचाना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दुजोरा दिला असून पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना बडतर्फ करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर.के.वाईन्स प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यांचा तसेच पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर चौकशीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी नियुक्त करण्यात आले होते. फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चाटींग तसेच आर.के.वाईन्स संबधित मालक तसेच पोलीस कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यात आले होते. तसेच त्यांच्या आवाजाने नमुनेही मुंबईला पाठविण्यात होते. दरम्यान जनशक्तिने संबंधित कर्मचार्‍यांसह त्याच्या मागील सेवा काळातील रेकार्ड तसेच कामगिरी तपासून पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यावर शिक्का मोर्तब झाला असून जनशक्तिचा अंदाज खरा ठरला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच

Copy