आर.आर.सोनवणे गुणगौरवने सन्मानीत

0

चोपडा : वेळोदे येथील रहिवासी के.आर. सोनवणे सरांचे बंधू व अमळनेर तालुक्यातील भरवस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर. आर. सोनवणे यांना ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशन धुळे यांच्यातर्फे नाशिक विभागस्तरीय गुणगौरव पुरस्कार धुळे येथील दो.शा. गरूड वाचनालयात नाशिक पदवीधर मतदार संघातील आमदार डॉ. सुधीर तांबे व काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या अ‍ॅड. ललीता पाटील यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विलास माळी, अ‍ॅड.संभाजी पगारे, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील शिक्षक उपस्थित होते. सोनवणे यांना सामाजिक, शैक्षणिक पर्यावरण व रक्तदान करणे याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे संस्थापक श्रीराम गबाजी सोनवणे, चेअरमन प्रा. संजय सोनवणे व मुख्याध्यापक व्ही.एस. सोनवणे यांनी अभिनंदन केले.