आर.आर.च्या संस्थाचालकांची बाजू ऐकून घेण्याचे आदेश

0

जळगाव। आर.आर. विद्यालयातील शिक्षक संस्थाध्यक्ष यांच्या वादाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना न्यायालयाने पाठवलेल्या अहवालावर कुठलाही निर्णय घेऊ नये, यात संस्थाचालकांचे म्हणणे ऐकून घ्यावेत, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने 25 एप्रिल रोजी दिले आहेत. संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी हे शिक्षकांना मानसिक आर्थिक त्रास देत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली होती.

या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. चौकशी समितीचा अहवाल शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्यातच संस्थाध्यक्ष लाठी यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. संस्थेने शिक्षकांना वेळोवेळी 149 मुद्द्यांवर सूचना, नोटीस दिल्या होत्या. याची देखील चौकशी व्हावी, असे या याचिकेत नमूद केले होते. चौकशी समितीने आपल्या मागणीची दखल घेतल्यामुळे लाठींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने लाठींचे म्हणने ऐकून घेऊन नंतर शिक्षण उपसंचालकांनी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. आर.आर.विद्यालयातील हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यत पोहोचले आहे. अधिवेशनातील हा तारंकीत प्रश्‍न राहिलेला आहे.