आर्मीत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षीत युवकांना गंडवणार युवक जेरबंद

0

शेंदुर्णी : आर्मीमध्ये भरती करुन देण्यासाठी राज्यातील दहा पेक्षा अधिक सुशिक्षीत युवकांना गंडविणारा अमित आनंदराव चव्हाण (रा. उंडाळे, ता-कराड) हा मुख्य आरोपी फरार असुन त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी रकामा स्विकारण्यासाठी आपल्या बँक खात्याचा मुक्तपणे वापर करणार्‍या त्याच्या भावास सहआरोपी म्हणुन पुणे येथुन पहुर पोलीस ठाणे अंतर्गत शेदुर्णी दुरक्षेत्राचे सपोनि हनुमंतराव गायकवाड व त्यांचे सहकारी पोकॉ जितेंद्र परदेशी यांनी जेरबंद केले. आरोपीस जामनेर येथील न्यायालयाने आधी 21 ते 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देउन नंतर न्यायालयीन कोठडीत सब जेलला रवानगी केली आहे.

पैश्याच्या तगद्यावरून एकाने केली आत्महत्या
महाराष्ट्रात चार ते पाच वर्षात वेगवेगळ्या एजंटमार्फत सुशिक्षीत युवकांना सैन्यात भरती करुन देण्याची लालुच देऊन या ठगाने एजंटा मार्फत पैसे जमा केले ते पण आपल्या दोन भावंडांच्या बँक खात्यांत रकमा जमा करायला लावुन फसवणुक झालेल्या युवकांच्या तगाद्याने निर्माण झालेल्या मनस्तापाने त्याचे एका भावाने आपली जिवन यात्रा संपवीली आहे. तर दुसरासह आरोपी म्हणुन जेलची हवा खात असतांना मुख्य ठग फरार आहे. आपल्या मुलांचे आयुष्य घडावे म्हणुन त्याची शिक्षणापासुन काळजी घेणारे गरीब मायबाप मुलाला शासकीय नोकरी लागुन त्याचे सोबतच आपलेही बाकी आयुष्य सुखी होण्यासाठी अश्या भामट्याकडुन ठगवले जाण्याच्या घटना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे.

स्थानिक एजंटाने कमिशनच्या आमिशापोटी नगरीकांची फसवणूक
शेंदुर्णी येथे अशाच प्रकार घडला. 2013 मध्ये येथिल तीन ते चार युवक पोलीस भर्ती किंवा सैन्य दलाच्या भर्तीची तयारी करीत होते. त्यांना हेरुन तुमची थेट नियुक्ती करुन देतो सांगुन स्थानिक एजंटाने मिळणार्‍या कमिशनच्या आमिशापोटी अमित आनंदराव चव्हाण (रा. उंडाळे, ता. कराड) येथिल या ठगावर विश्वास ठेवून प्रत्येकी टप्याटप्याने सरासरी तीन ते चार लाख रुपये त्यास दिले. काही रकमा बँक खात्याद्वारे तर काही प्रत्यक्ष रोखीने स्वीकारुन या ठगाने युवकांना नियुक्तीपत्रेही दिली परंतू, हे युवक ज्या वेळेस नियुक्ती पत्राच्या आधारे नियुक्त होण्यासाठी गेले असता पत्ता दिलेल्या संबधीत कार्यालयाने हि खोटी नियुक्ती पत्रे असल्याचे समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसात तक्रार दिली पोलीसांनी सर्व शहानिशा केल्यानंतर स्थानिक मध्यस्थ कडोबा सांडू निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या चौकशीतील माहीतीनुसार तीस लाखांपर्यंतचा गंडा घालुन आठ ते दहा युवक फसवले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.