आरोग्य सहायकासह 16 कर्मचार्‍यांना क्वारंटाईन

0

नवापूर तालुका प्रशासन हादरले
नवापूर:कोरोनाचा कहर आता जास्तच होत असून काळजी घेणे महत्वाचे ठरत आहे. कोरोनापासून दूर असलेल्या नवापूरला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आरटीओ तपासणी नाक्यावर आरोग्य विभागाचे आरोग्य सहायक धुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने चिंतेसह चर्चा सुरु झाली आहे. तहसीलदार उल्हास देवरे, नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी यांच्या पथकाने तात्काळ नवापूर तपासणी नाक्यावर जाऊन आरोग्य कर्मचार्‍याला कर्तव्यावरून बाजूला करत क्वारंटाईन, स्वॅब नमुने घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांसोबत असलेले एक सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस कर्मचारी, 5 आरोग्य कर्मचारी अशा 16 कर्मचार्‍यांना क्वारंटाईन केले आहे.
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथे महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तपासणी नाका आहे. बाहेरील राज्यातील वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन विभागाची टिम कार्यरत आहे. त्यातील एक आरोग्य कर्मचार्‍यांनी धुळे येथील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाला दोन वेळा गाडीत बसवून रूग्णालयात घेऊन गेले होते. त्यामुळे धुळे प्रशासनाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाला कळविले. त्यानंतर नवापूर तालुक्यातील प्रशासन घटनास्थळी जाऊन त्यांना क्वारंटाईन स्वॅब तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

नवापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही
नवापूर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना माहिती होते की कोरोना पॉझिटिव्ह महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली. ही बाब वरिष्ठांना कुठलीही माहिती न देता नवापूर सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावण्यासाठी गेले. त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करणे गरजेचे होते.नवापूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर निघू नये. घरात रहावे, नियमांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये. नवापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही. भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी केले आहे.

Copy