आरोग्यासाठी धावले माहेश्‍वरी समजाबांधव

0

 

जळगाव : माहेश्‍वरी वैद्यकीय संघटन आयोजित ‘स्व.अमिरचंदजी दहाड माहेश्‍वरी मिनी मॅरेथॉन’ पाच किलोमिटर धावण्याची स्पर्धा रविवार 18 रोजी सकाळी 7 वाजता मोहाडी रोड, जळगाव येथे पार पडली. या स्पर्धेत 5 ते 76 वर्षे वयोगटातील 323 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर नितीन लढ्ढा यांनी स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवून केले. सदर कार्यक्रमाला माहेश्‍वरी जिल्हा सभा अध्यक्ष मनिष झंवर यांच्यासमवेत समाजाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मिलींद राठी, सुनिल झंवर, बाळकृष्ण बेहडे, जवाहरलाल झंवर, राधेशाम बजाज, तेजस देपूरा, हरीष मुंदडा, नगरसेवक जितेंद्र मुंदडा, दिलीप दहाड, प्रा.संजय दहाड, अ‍ॅड.राजेंद्रप्रसाद माहेश्‍वरी, श्यामसुंदर झंवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट देण्यात आले व स्पर्धेतील 7 वेगवेगळ्या वयोगटातील महिला व पुरुष गटातील पहिल्या 3 विजेत्यांना पारितोषीके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.बी.जे.लाठी, प्रिया झंवर व आभार डॉ.गोविंद मंत्री यांनी व्यक्त केले.

यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
माहेश्‍वरी वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ.निलेश लाठी, सचिव डॉ.निलेश चांडक, डॉ.चंद्रशेखर सिखची, डॉ.सुदर्शन नवाल, डॉ.सुभाष देपूरा, डॉ.के.एम.दहाड, डॉ.शरद अग्रवाल, डॉ.महेश बिर्ला, डॉ.जगदीश लढ्ढा, डॉ.भूषण झंवर, डॉ.मोहन देपूरा, डॉ.सुयोग सोमाणी. डॉ.प्रशांत मंत्री, डॉ.सुशिल मंत्री, डॉ.जितेंद्र मंडोरे, उल्पेश झंवर, डॉ.व्ही.के.सोमाणी, डॉ.अरुण माहेश्‍वरी, डॉ.धिरज माहेश्‍वरी, डॉ.भुषण सोमाणी, डॉ.पवन चांडक, डॉ.दिपक अटल, डॉ.एम.बी.नवाल, डॉ.सुयश नवाल, डॉ.पवन चांडक, डॉ.व्यंकटेश काबरा, डॉ.गितांजली लाठी, डॉ.अर्चना काबरा, डॉ.सविता चांडक, डॉ.रेणू नवाल, डॉ.वैशाली मंडोरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

मीनी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते स्पर्धक
5 ते 15 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम चिन्मय कलंत्री, द्वितीय यश चांडक, तृतीय शुभम बिर्ला व कार्तिक झंवर. महिला गट – प्रथम मनाली कासार, द्वितीय भूमी झंवर, तृतीय प्रचिती ब्रालधी.
16 ते 25 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम मुकुल मंदडा, द्वितीय शुभम मंडोरा, तृतीय प्रतिक मणियार. महिला गट- प्रथम रुचिता भुतडा, द्वितीय रुपाली साबू, तृतीय रिया मंडोरा.
26 ते 35 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम आशिष जाखेटे, द्वितीय शिवप्रसाद लाठी, तृतीय लौकिक मुंदडा. महिला गट – प्रथम शितल कासर, द्वितीय नेहा भुतडा, तृतीय प्रिया कासर.
36 ते 45 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम निलेश बाहेती, द्वितीय गुरुप्रसाद तोतला, तृतीय आशिष काबरा. महिला गट – प्रथम रष्मी कासर, द्वितीय शिल्पा मंडोरा, तृतीय कविता झंवर.
45 ते 55 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम अशोक लढ्ढा, द्वितीय मिलींद राठी, तृतीय अनिल सोमानी. महिला गट – प्रथम सुधा काबरा, द्वितीय सुनिता मुंदडा, तृतीय मनिषा सोमानी.
56 ते 65 वर्ष वयोगट – पुरुष गट – प्रथम विजय नवाल, द्वितीय शरद न्याती, तृतीय सतीष कलंत्री. महिला गट – प्रथम स्नेहलता लाठी, द्वितीय शोभा देपूरा, तृृतीय पुष्पा मुंदडा.
66 ते 76 वर्ष वयोगट – पुुरुष गट – प्रथम जयंतीलाल झंवर, द्वितीय डॉ.एम.बी.नवाल, तृतीय डॉ.चंद्रशेखर सिखची. महिला गट – प्रथम पुनम मालुधने, द्वितीय इंदू लढ्ढा.