आरावे गाव ग्रामस्थांनी केले सील

0

शिंदखेडा: बाम्हणे गावात कोरोना संशयित आढळल्याने तालुक्यातील आरावे ग्रामस्थांनीही खबरदारीचा उपाय म्हणून गाव पूर्णपणे सील केले आहे. गावात एमएसएफ व एनएसएस जवानांना गावात ठिकठिकाणी थांबविण्यात आले. गावात कोणाचाही शिरकाव होणार नाही, यासाठी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील समाज सेवक समाधान धनगर व चिमठाणे पोलीस कर्मचारी व गावातील तरुण मित्र मंडळ व शिपाई कर्मचारी वर्ग इतर सर्वांनी मिळून गावात कडक नियंत्रण ठेवले आहे. ‘घरात रहा, सुरक्षित रहा, परिवाराची काळजी घ्या’, असे आवाहन केले आहे.

Copy