आरएसएस, सोशल लॅब यांनी केले वृक्षारोपण

0

शिंदखेडा: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन समिती, आरएसएस, सोशल लॅब औरंगाबाद यांनी साईनंद गार्डन व गोपालदास नगर येथे वृक्षरोपण करून संगोपनाची जबाबदारी घेतली.

वृक्ष संवर्धन समितीने मागेल त्याला वृक्ष मोहीम दरवर्षाप्रमाणे यावर्षी राबवत आहे. वृक्ष लावणे जितके महत्वाचे आहे. तितकेच महत्वाचे लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे गरजेचे आहे.
शहरातील साईनंद गार्डन व गोपालदास नगर याठिकाणी गुलमोहर, निंब, सिसम, करंज हे वृक्ष लावण्यात आले. लावलेल्या वृक्षांची कॉलनीतील रहिवाशी यांनी संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.

यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, भूषण पवार, रोहित कौठळकर, बबलू मराठे, सतिष कुवर, कॉलनीतील रहिवाशी निलेश सोनार, गौतम बाविष्कर, अनिल जाधव, भरत पाटील, गुलाब कोळी, राकेश ठाकूर, आरएसएसचे विजय चौधरी, संदीप चौधरी, मयूर पवार, विनोद माळी, विनोद जाधव, भिमसिंग गिरासे, अमोल मराठे, अनिल मराठे, गौरव ठाकूर, गौरव बडगुजर, कुणाल चौधरी, वैभव चौधरी, सोशल लॅबचे गौतम बोरसे, राजेश वसावे, किरण लोंढे उपस्थित होते.