आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉ.रवींद्र भोळे

0

उरुळी कांचन: एआयएमए आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशियनचे उपाध्यक्ष डॉ.नितीन पाटील यांनी नियुक्ती केली आहे. डॉ. रवींद्र भोळे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. कोरोना काळातही त्यांनी सेवा बजावली आहे, याची दखल घेऊन त्यांची पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोरोनात त्यांनी औषधींचे वाटपही केले आहे.

डॉ.रवींद्र भोळे यांनी ३५ वर्षात राज्यात विविध भागात सेवा बजावली आहे. सामाजिक , धार्मिक, वैद्यकीय, अपंग सेवा, व्यसनमुक्ती, नैसर्गिक आपत्ती मदत, संस्थात्मक कार्य, मतिमंद मूकबधिर सेवा , वृक्षारोपण, राष्ट्रीय सेवा योजना, एड्स निर्मूलन, कुष्ठरोग दुरीकरण मोहीम, पल्स पोलिओ मोहिम, एन.सी.डी कॅम्प, फ्लु कॅम्प, नेत्ररोग तपासणी, हृदयरोग तपासणी शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिर, युरिनरी कॅम्प, हृदय रोग यांना आर्थिक मदत मिळवून देणे, कुपोषण मोहीम, कुष्ठरोग दुरीकरण मोहीम आदी उपक्रम नेहरू युवा केंद्रातर्फे राबवले आहेत.

डॉ.रवींद्र भोळे पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई प्रतिष्ठान, नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्नित व मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, निती आयोग संलग्नित आयएसओ नामांकने मिळालेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. निवडीबद्दल डॉ.भोळे यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Copy