आयसीसी महिला २०-२० वर्ल्डकप: आज भारतीय महिला संघ भिडणार इंग्लंडशी

0

नॉर्थ साऊथ- आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप आतापर्यंत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची आज इंग्लंड संघाशी उपांत्यपूर्व (सेमीफाइनल) सामना होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. विदेशी वेळेनुसार हा सामना आज होणार आहे. मात्र भारतीय वेळेनुसार हा सामना उद्या सकाळी ५.३० वाजता सुरु होईल.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत मजल मारता आली आहे. भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.

Copy