आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली- आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर सध्या सुट्टीवर आहेत. त्यांच्या विरोधात व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चौकशी सुरु आहे. अशात आता त्यांच्या राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे आता आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि आणि सीईओ असतील. या दोन्ही पदांचा राजीनामा चंदा कोचर यांनी दिला आहे. संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी हे पद देण्यात आले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार चंदा कोचर यांची चौकशी सुरुच राहणार आहे.