आयसिस मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता

0

मुंबई – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड सीरिया (आयसिस) ही दहशतवादी संघटना मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला करण्यासाठी दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करतील, त्यामुळे राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26/11 प्रमाणे हा हल्ला होऊ शकतो, त्यासाठी नऊ दहशतवाद्यांचा गट तयार आहेत, हे सर्व जण आसामचे असल्याची माहितीही गुप्तचर संघटनेला मिळाली आहे.

एकीकडे तटरक्षक दलाने अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले असताना मुंबई पोलिसांनी मात्र गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. नेहमीप्रमाणे अलर्ट देण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत. क्राइम ब्रांचचे अधिकारीदेखील लॉज आणि हॉटेल्सची तपासणी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकार्‍यांना रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.