आयसिसच्या दहशतवाद्याची कबुली

0

 

अहमदाबाद/राजकोट: आयसिसच्या म्होरक्या कडून दिलेली कामगिरी आपण पार पाडु शकत नाही म्हणून माझी पत्नी शाहज़ीन सतत मला षंढ म्हणून टोमणा मारायची अशी माहिती वासिमने आतंकवाद विरोधी पथकाच्या चौकशीत दिली। हा म्होरक्या भारतीय असण्याचा संशय आहे, तो सतत सामाजिक संकेतस्थळावरून आपल्या संपर्कात असायचा, असेही वासिम म्हणाला। त्यामुळे मी बॉम्बस्फोटांचा कट रचल्याची कबुली त्याने दिली आहे.
रविवारी  राजकोट आणि भावनगर येथून अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पोलिसांना आणखी ४० साथीदार्यांची नावे सांगितली आहेत। या माहितीची पोलीस आता शहानिशा करत आहेत। अटकेत असलेले वासीम व  नदीम हे दोन दहशतवादी भाऊ असून  अधिक लोकसंख्या असलेल्या त्रिकोण बाग आणि गौंड़वाडी येथे बॉम्ब स्फोट करण्याचा कट त्यांनी रचला होता। सोमवारी या दोघाना १० मार्च पर्यन्त आतंकवाद विरोधी पथकाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
     बायकोच्या सततची टोमणे ऐकून वासिम व त्याचा भाऊ  अखेर १५ जानेवारीला चोटियाला येथे जाण्यास निघाला। शहरापासून १० कि मी अंतरावर आपण पकडले जावू अशी शक्यता दिसताच या दोघानी वाहनाने भावनगर येथे जाण्याचा निर्णय घेतला। चौकशीतून हाती आलेल्या माहितीनुसार हे दोन दहशतवादी आयसिसच्या म्होरक्याने दिलेल्या आदेशानुसार राजकोट येथील सदर बाजार येथून फटाके आणि ९ वोल्ट च्या बॅटऱ्या बॉम्ब बनवण्यासाठी घेणार होते। आम्ही वासिम ची पत्नी शाहज़ीनच्या विरोधात पुरावे जमावण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आतंकवादी विरोधी पथकाने म्हटले आहे.