आयशर समोरा-समोर धडकल्या : भुसावळातील चालक जागीच ठार : दोघे जखमी

पाचोरा/भुसावळ : पाचोरा-भडगाव दरम्यान दोन आयशरची समोरासमोर जोरदार धडक होवून भुसावळातील चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दोन आयशर समोरा-समोर धडकून अपघात
बांबरुड (महादेवाचे) जवळील तितुर नदी पुलाजवळ भुसावळहुन मुंबईला केळी घेवुन जाणारी आयशर (एम.एच.46 ए.आर. 3888) व भडगावकडून पाचोरा शहराकडे येणारी रीकामी आयशर (एम.एच. 20 बी.टी. 2247) या दोन्ही आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. यात भुसावळहुन मुंबईकडे जाणार्‍या आयशर चालक इलियास शेख (46, रा.भुसावळ) हे जागीच ठार झाले तर इम्तियाज खान (43) व शाहरुख सलिम खान (28, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) हे गंभीर जखमी. त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.