आयपीएल बोलीत इंग्लिश खेळाडूंना मिळणार घबाड

0

नवी दिल्ली: आयपीएलच्या बोलीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासह इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स, ख्रिस वोकस, वन-डे कर्णधार इयॉन मोर्गन यांच्यासह सात खेळाडूंनी आपली बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. याचा अर्थ संघांना या खेळाडूंवर 2 कोटीपेक्षा जास्त बोली लावावी लागेल. 20 फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे भरणार्‍या आयपीएल बाजारात लंकेचा कर्णधार एन्जेलॉ मॅथ्यूज, ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन, पॅट कमिन्स यांची बेस प्राईसही 2 कोटी रुपये आहे.

एकूण 799 खेळाडूंनी यंदाच्या बोलीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 160 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय लढत खेळली आहे. इंग्लंडच्या संघातील खेळाडू हे यंदाच्या बोलीतील सर्वांत मोठे आकर्षण ठरू शकते. टीम इंडियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे आणि टी-20 मालिकेत जबरदस्त कामगिरी करणार्‍या बेन स्टोक्सवर बहुतेक संघांच्या नजरा आहेत. माजी कर्णधार अ‍ॅन्ड्र्यू ट्रॉस इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या संचालक झाल्यानंतर त्याने आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती.