आयपीएलमध्ये बेबी डॉलसह सुनील ग्रोव्हर दिसणार

0

मुंबर्ई । बेबी डॉल म्हणजे सनी लिऑन हिच्यासोबत सुनील ग्रोव्हर हे दोन्ही स्टार एकत्रित दिसणार आहे.मात्र कोण्या कॉमेडी शो साठी नाही तर आयपीएलमध्ये सुनील ग्रोव्हर हा आपल्या शब्दाची जादू तर बेबी डॉल आपल्या अदांनी सर्वांना मोहिनी टाकणार आहे.सुनील ग्रोव्हर ‘ द कपिल शर्मा शो ’ मधून गायब झाल्यानंतर बर्‍याच कालावधीनंतर सर्वाजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.ग्रोव्हरच्या चाहत्यांना तो पुन्हा लाईव्ह शो मध्ये दिसणार आहे.

द कपिल शर्मा शो ’ मधून गायब झाल्यानंतर प्रथमच दिसणार
कपिल शर्मासोबत विमानात झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये अजून परतलेला नाही. कपिल आणि इतर कॉमेडियन्सचे त्याला आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून मागील काही दिवसांपासून गायब असलेला सुनील ग्रोव्हर, पुन्हा एकदा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. कॉमेडियन आयपीएलमध्ये मसाला कॉमेंट्र करताना दिसेल. महत्त्वाचे म्हणजे त्याच्यासोबत बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनी पण असेल. स्वत: सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.सुनीलने ट्विटर लिहिले आहे की, ‘येत आहे, प्रत्येकाची चाहती, फॅन्स तिला बेबी डॉल म्हणतात. अंदाज लावा, मसाला कॉमेंट्रीसाठी मला कोण साथ देणार आहे?’यानंतर सगळ्यांनाच समजले की, ही बेबी डॉल म्हणजे सनी लिऑनी आहे. आयपीएलचे युसी न्यूज अ‍ॅप बेस्ड कॉमेंट्री आहे. इथे हे दोन्ही स्टार्स 13 एप्रिलला लाईव्ह कॉमेंट्री करतील. गुरुवारी होणारा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवला जाईल.