आयडी स्फोट; तीन जवान शहीद

जग्वार: नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले आहे तर दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.

आज गुरुवारी सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात प्रेशर आयडीचा स्फोट झाला. झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. झारखंड पोलिसांचे म्हणणे आहे की, नक्षलवाद्यांनी आयडी पेरून ठेवले होते. या स्फोटानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Copy