आयटीआयच्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

0

जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कार्यरत असलेल्या शिक्षकाचा सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली. प्रकाश नामदेव अहिरे (वय-40) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. सकाळी मृतदेहास जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयात आयटीआयतील शिक्षकांनी व विद्यार्थी-विद्यार्थींनींनी एकच गर्दी केली होती.

प्रकाश नामदेव अहिरे हे नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील असून सध्या शहरातील प्रभात कॉलनी येथे पत्नी व मुलगा-मुगलीसोबत राहत होते. तर औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांना राहत्या घरी अचानक हृदयविकाचा झटका आला. अहिरे यांना हृदयविकाचा झटका येत असल्याचे त्यांच्या पत्नी व मुलगा यांना लक्षात येताच त्यांनी प्रकाश अहिरे यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रकाश अहिरे यांची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. यावेळी प्रकाश अहिरे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच रूग्णालयात आयटीआयमधील इतर शिक्षकांनी तसेच विद्यार्थीं-विद्यार्थींनी जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास अरूण पाटील हे करीत आहेत.