‘आयओए’चे निलंबन तात्पुरते!

0

नवी दिल्ली : आजीवन अध्यक्षपदाच्या वादावरून सुरु झालेला गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसताना आयओएचे तात्पुरते निलंबन करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात आयओएवर निलंबनाची कारवाई केली आहे. सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांना आजीवन अध्यक्षपदावरून हटवले जात नाही, तोवर आयओएचे तात्पुरते निलंबन करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी जाहीर केले आहे. मंगळवारी आयओएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कलमाडी आणि चौटाला यांची आयओएच्या मानद आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. कलमाडी यांना 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती. तर चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे बरीच टीका होऊ लागल्यावर कलमाडींनी आपण हे पद नाकारत असल्याचे आयओएला कळवले होते. दरम्यान आयओएने कोणतेच पाऊल उचलले नसल्याने क्रीडा मंत्रालयाने आयओएची संलग्नता रद्द केली आहे.

तोवर कारवाई कायम राहणार
कलमाडी यांना 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती. तर चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या दोघांच्या नियुक्तीमुळेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) बरखास्त करण्याची वेळ आली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त संघटक सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अजीव अध्यक्षपदांवरील नियुक्ती रद्द करीत नाही तोपर्यंत ही कारवाई कायम राहील, असे बजावण्यात आले आहे.

सर्व प्रकारचे सहाय थांबविले
या नियुक्तीबद्दल मंत्रालयाने ‘आयओए’ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास उत्तर देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत होती; पण उत्तर देणार नसल्याचे ‘आयओए’ने गुरुवारीच स्पष्ट केले होते. शुक्रवारी मात्र ‘आयओए’ने एक पाऊल मागे टाकले. आमचे अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची गरज आहे. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती करण्यात आली. ती मंत्रालयाने अमान्य केली. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बरखास्तीमुळे सरकारने राष्ट्रीय ऑलिंपिक समिती (एनओसी) म्हणून बहाल केलेले हक्क आणि अधिकार ‘आयओए’ला वापरता येणार नाहीत. सरकारकडून दिले जाणारे आर्थिक किंवा इतर सर्व प्रकारचे साह्यसुद्धा थांबविले जाईल.

बात्रांचा राजीनामा
दरम्यान, कलमाडी आणि चौटाला यांच्या नियुक्तीबद्दल ‘आयओए’चा निषेध करीत हॉकी संघटक तसेच नरींदर बात्रा यांनी ‘सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की, कलमाडी आणि चौटाला यांनी ‘आयओए’मध्ये मागील दाराने प्रवेश करण्यास माझा तीव्र विरोध आहे. मी बऱ्याच सदस्यांकडून खातरजमा केली. तेव्हा बहुतेकांना सात दिवस अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती मिळाली नसल्याचे लक्षात आले. कलमाडी यांनी हे पद नाकारल्याबद्दल बात्रा यांनी त्यांचे आभार मानले.