आयएसआयच्या संशयित हस्तकाला नागपुरातून अटक

0

नागपूर : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या संशयित हस्तकाला नागपुरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आज सकाळी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या संयुक्त कारवाईत निशांत अग्रवाल नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये निशांत अग्रवाल काम करत होता. नागपूरच्या उज्ज्वल नगरमधील मनोहर काळे यांच्या घरी भाड्यानं राहत होता. नागपूर अगोदर निशांत अग्रवाल हैदराबादमध्ये कार्यरत होता.

Copy