आयएनक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

0

दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची तब्बल ५४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. तसंच कार्तीच्या इंग्लंड,स्पेन आणि ऊटीतील बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.

कार्तीची कंपनी असलेल्या आयएनक्स मीडिया हाऊसला अवैध रित्या पैसा मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने तपास केला असता बऱ्याच अवैध व्यवहारांची माहिती उघड झाली. याप्रकरणी सीबीआयने कार्तीविरूद्ध एफआयआरही दाखल केला आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीची कारवाई सुरू असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. जप्त झालेली ५४ कोटींची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहे.

काय झाले जप्त?

उटी, कोडाइकेनलचे बंगले
स्पेनच्या बार्सीलोनातील टेनिस क्लब
इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस
चेन्नईच्या बँकेतील ९० लाखांचे फिक्स्ड डिपॉझिट
दिल्लीच्या जोरबाघ परिसरातील आलिशान फ्लॅट

Copy