Private Advt

आम्हा नगरसेवकांना “कुणी टेंडर देता का रे टेंडर”

जळगाव – शहरालगत महामार्गावर सुरु असलेल्या चौपदरीकरणाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. या ठिकाणी या महामार्गावर पथदिव्यांच्या टेंडर हे स्थानिक नगरसेवकांना मिळावे यासाठी काही नगरसेवकांचा खटाटोप सुरू आहे.

याबाबतची सूत्रांनी दिलेली माहिती अशी की महापालिकेला पालकमंत्र्यांकडून प्राप्त निधीतून महामार्गालगत पथदिवे बसविण्यात येणार आहेत. खोटे नगर स्पॉट ते कालिकामाता जळगाव पर्यंत हे पथदिवे बसविण्यात येणार आहेत. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी या निधीसाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. याकाळात महामार्ग असल्या तरी काम सुरू होण्याआधीच बंडखोरांची नाराजी वाढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही बंडखोर नगरसेवकांना या पथदिव्यांचा टेंडर असल्याची माहितीही समोर आली आहे.

यामुळे नगरसेवक टेंडरसाठी कुठल्या थराला जातात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.