आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क सॅनिटायझर वाटप

फैजपूर : रावेर विधानसभा मतदारसंघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस रावेर विधानसभातर्फे कोविड रुग्णालयातीलल रुग्णांना फळे, सॅनिटायझर व मास्कचे वाटप कोविड सेंटर, जेटीएम. आमोदा रोड करण्यात आले. युवक काँग्रेस रावेर विधानसभेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी पालिका काँग्रेसचे गटनेते कलिम खान, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, उपाध्यक्ष आसीफ मॅकेनिक, वसीम जनाब, मुदस्सर, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम तडवी, अमोल चौधरी, आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री बडगुजर, औषध निर्माण अधिकारी विनोद बोदडे, रेणुका वाघ, अनिल महाजन, सोनाबाई धनगल, सागर चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस वसीम जनाब, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विधानसभा मुदस्सर नजर व शहर अध्यक्ष युवक काँग्रेस वसीम तडवी यांनी केले.

Copy