आमदार शिरीष चौधरी म्हणाले : काहीही झाले तरी काँग्रेसमधून बाहेर पडणार नाही 

It is impossible to leave Congress in this life : Congress MLA Shirish Chaudhary रावेर : काहीही झाले तरी मी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार नाही, आपल्याबद्दल अफवा पसरवल्या जात असून भाजपा जास्तीत-जास्त मला त्रास देण्याचा प्रयत्न करती मात्र मी या सर्व गोष्टींना घाबरत नाही. भाजपाची चलती जास्त काळ राहणार नाही, येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून सर्व-साधारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा देणार असल्याचा निर्धार आमदार शिरीष चौधरी दिवाळीनिमित्त आयोजित बैठकीत केला.

राज्य शासनाकडून जिल्हा परीषद शाळा बंद करण्याचा घाट
दिवाळीच्या पाडव्यानिमित्त रावेर व यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक खिरोदा येथे आमदार चौधरी यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी आमदार चौधरी यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना भाजपावर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा माझा अपघाती काळ सोडला तर माझ्या ती पिढ्यांपासून आम्ही काँग्रेसमध्येच आहोता. मी भाजपात जात असल्याची माझ्याबद्दल अफवा पसरवून मतदारसंघात संभ्रम निर्माण केले जात आहेत.काहीही झाले तरी मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, सर्वसाधारण जनता महागाईमुळे, बेरोजगारीमुळे त्रस्त आहे तर इकडे राज्य सरकार जिल्हा परीषद शाळा बंद पाडण्याचा घाट घालत आहे त्यामुळे गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार असून यास भाजपाच जबाबदार राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर आमदारांनी टिका केली.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला धनंजय चौधरी, आर.के.पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन गोपाळ नेमाडे, डी.सी.पाटील, सुनील कोंडे, दिलरुबाब तडवी, डॉ.राजेंद्र पाटील, योगेश गजरे, महेंद्र पवार, विलास ताठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.