धक्कादायक: जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण

0

जळगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटी, राजकीय नेतेही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. दररोज पाचशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असताना काल एकाच दिवसात तब्बल ८७० रुग्ण आढळून आले. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांनी कोरोनाचे लक्षण दिसून आल्याचे चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी स्वत:ला क्वारंटीन करून घेतले असून संपर्कात असलेल्यांनी तपासणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.