आमदारांच्या इशार्‍यानंतर कार्यालय बंद करून महावितरणचे कर्मचारी फरार

शिवसेनेचे ‘ताला ठोको’ आंदोलन; आ. किशोर पाटलांसह इतरांना अटक व सुटका

पाचोरा (प्रतिनिधी )- वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेध करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयांना ‘ताला ठोको’ आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आमदारांच्या या हाकेचा धसका घेत महावितरण कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनाच्या २० मिनीटे आधीच कार्यालयाला कुलूप लावून फरार झाले. तरी देखिल आमदारांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाला आणखी एक कुलूप लावून ‘ताला ठोको आंदोलन यशस्वी करण्यात आले. दरम्यान यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह आंदोलकांना अटक व सुटका करण्यात आली.