आमदगावच्या तरुणाचा विषारी द्रवपदार्थ सेवनाने मृत्यू

0

बोदवड- तालुक्यातील आमदगाव येथील 24 वर्षीय तरुणाने शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाड्यात काहीतरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. चेतन मुकुंदा कोलते (24 आमदगाव) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप देविदास किनगे (रा.आमदगाव) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत.

Copy