आमच्या हृदयातून तू कधीही निवृत्त होणार नाही; बॉलीवूड सेलिब्रिटींची भावना

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी काल संध्याकाळी अचानक निवृत्तीची घोषणा केली. चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान बॉलीवूड सेलिब्रिटींनी भावनिक पोस्ट करत धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींनी धोनीच्या आठवणी कधीही विसरता न येणाऱ्या आहेत. धोनीने क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असेल तरी आमच्या हृदयात तो कायम आहे, हृदयातून त्याने निवृत्ती घेतलेली नाही अशी भावना व्यक्त होत आहे.

आमच्या मनातून तू कधीही निवृत्त होणार नाहीस, अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माने धोनीचा फोटो शेअर करत ‘कधीही विसरता न येणाºया आठवणी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद एस.एस. धोनी….’ असे म्हटले आहे.

रोहित शर्माने भारतातील क्रिकेटमधील प्रभावशाली खेळाडूंपैकी तू एक होतास असे म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र साहेवागने “धोनी सारखा न कोणी होता ना कोणी आहे” अशी भावनिक पोस्ट केली आहे.

‘एम. एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात धोनीच्या पडद्यावरील पित्याची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. मेरे प्यारे महेद्र सिंग धोनी जिंदगी की असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमी हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, असे त्यांनी लिहिले आहे.

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी, धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया देतांना नाही… तू सर्वोत्तम म्हणून ओळखला जातो… आमचे मनोरंजन केल्याबद्दल आभार, अशी पोस्ट केली आहे.