आफ्रिकेने केला न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव

0

ऑकलंड। हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हाशिम आमलाच्या 62 धावांच्या सुरेख खेळीने दक्षिण आफ्रिकेचे 6 बाद 185 धावांचे आव्हान उभे राहिले.

आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तिसर्‍याच षटकांत लागोपाठच्या चेंडूंवर दोन फलंदाज गमावले. या धक्क्यातून त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. ताहिरच्या फिरकीसमोर त्यांच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. टॉम ब्रूस (33) आणि शेवटी टीम साऊदी (20) यांच्या फलंदाजीने त्यांनी डावांत शतक झळकाविल्याचे समाधान लाभले. दक्षिण आफ्रिकेच्या ताहिरने 24 धावांत पाच गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात डी कॉकला भोपाळाही फोडता आला नाही. अर्थात, त्याची कसर आमलाने भरून काढली. त्याने 43 चेंडूंत 62 धावांची खेळी केली.