आप्पा महाराज पुण्यतिथी निमित्ताने 1 मार्चला किर्तन सोहळा

0

जळगाव । खानदेशातील वारकरी सांप्रदायाचे संत व जळगावनगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरूष संत अप्पा महाराज यांची 107 वी पुण्यतिथीनिमित्ताने 1 मार्चला श्रीराम मंदिर संस्थानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री संत अप्पा महाराज समाधी मंमदिरात 27 व 28 फेब्रुवारीला सकाळी सात ते बारा या वेळेत श्रीराम मंगेश महाराज जोशी यांचे ग्रथराज श्री यजुर्वेद संहिता पारायण होईल.

तर 1 मार्चला सकाळी आठला श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त सद्गुरू अप्पा महाराज यांचे पाचवे वंशज् मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते व शहरातील ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात श्री लघुरूद्राभिषेक होईल. तर श्रीराम मंदिरात रात्री आठला व्यंकटेश भजनी मंडळ (देवपिंप्री) यांचे वारकरी सांप्रदायीक भजनाचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी समाधी दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन केले आहे.