आनंदाची बातमी: यंदा चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा सुखद अंदाज

0

मुंबई – सध्या अवघा देश करोनाशी लढत असताना हवामान खात्याने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने व्यक्त केलेला हा पहिला अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होईल. या कालावधीत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

Copy