आनंदवार्ता : अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील वृध्द महिलाही कोरोनामुक्त

0

जळगाव– दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. चिंता, भितीत असणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात आढळून आलेली तिसरी कोरोनाबाधीत अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द महिला कोरोनामुक्त झाली आहे. उपचारादरम्यान 14 दिवसानंतरचे दोघेही पाठविण्यात आलेले तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान तिला दोन दिवस कोरोना रुग्णालयातच डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार असून परिस्थिती बघून तिला डिचार्ज देवून घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कोरोना रुग्णालयातून मिळाली आहे.

15 दिवसात महिला कोरोनातून झाली बरी

जळगावातील मेहरुण परिसरात पहिला यानंतर शहरातीलच सालार नगरातील दुसरा कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला होता. यापैकी सालारनगरातील रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर उपचारात मेहरुण परिसरातील कोरोनाबाधीत रुग्ण बरा झाला होता. यानंतर 17 एप्रिल रोजी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द कोरोना संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल झाली होती. दुसर्‍या दिवशी 18 रोजी दिवसा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती महिला कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपासून तिच्यावर कोरोना रुग्णालयात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरासह पारिचारिक, परिचारीका तसेच स्टॉप यांनी उपचार केले. उपचारात अवघ्या 15 दिवसातही वृध्द महिला कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान या महिलेला दोन दिवस कोरोना रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. यानंतर ती प्रकृती चांगली असल्यास तिला डिचार्ज देण्यात येणार आहे.

Copy