आनंदवनच्या कलाकारांनी चोपडेकरांचे मन जिंकले

0

चोपडा : चोपड्याशी तीन पिड्याशी संबध असून 1947 ला संस्थेचा जन्म झाला. बाबा आमटेनी सफाई कामगारांमंध्ये परमेश्वर पाहिले ते नर्मदा नदीच्या सानिध्यात रहात होते. आनदवनाला बरेच पुरस्कारानी सन्मान केला गेला. परंतु प्रसिध्दीसाठी कधी वर्तमान पत्राकडे गेलो नाही व कधी सत्कार स्विकारला नाही सत्कारापेक्षा सतकर्म महत्वाचे असल्याचे डॉ. विकास आमटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या किमया बहुउद्देशिय संस्था आयोजित कार्यक्रमात सांगितले.

डॉ. आमटे पुढे म्हणाले की पु.ल. देशपांडे हे 35 वर्ष आनंदवन येथे आले. साडे नऊ लाख कुष्टरोग्याशी नात जोडलं आहे. कुष्ठरोग्याचाकुष्ठ्यारोग्याचा हा जगातील पहिला कार्यक्रम आहे 200 कलावंत आहेत परंतू आज सव्वासे आणू शकलो असेही यावेळी सागितले. डॉ. विकास आमटे यांचा आनंदवनचे अंध अपंग व कर्ण बधिर कलावंतांनी हिंदी मराठी गितानी व नृत्य सादर करून अप्रतिम कलाविष्काराने चोपड्यातील हजारो प्रेक्षकांचे मन जिकले.

यांची होती उपस्थिती
आमदार चंद्रकांर सोनवणे, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, डॉ. विकास आमटे, डॉ. सुरेश बोरोले, डिवायएसपी सदाशिव वाघमारे, नगरसेवक जिवन चौधरी, प्रमोद बर्‍हाटेसर, कृृउबा सभापती जगन्नाथ पाटिल, घनशाम पाटिल, डा विकास हरताळकर, पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल, बाळासाहेब केदारे, पंकज बोरोले, हेमलता बोरोले, गजेंद्र जैस्वाल उपस्थित होते.